दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:40 AM2019-09-30T06:40:12+5:302019-09-30T06:40:33+5:30

दिवाळीनिमित्त एक्स्प्रेसमधील जादाची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

Special trains of trains for Diwali | दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

googlenewsNext

मुंबई : दिवाळीनिमित्त एक्स्प्रेसमधील जादाची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता करमळीसाठी गाडी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी करमळी येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल, तर करमळीहून दर शुक्रवारी दुपारी २ वाजता गाडी सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे ३.४० ला पोहोचेल.

२५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजता थिविमसाठी गाडी सुटेल. ही गाडी थिविम येथे दुसºया दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. २७ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान थिविम येथून दर रविवारी दुपारी २.३० गाडी लोकमान्य टिळक टर्मिनससाठी गाडी सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस दुसºया दिवशी पहाटे ३.४० वाजता पोहोचेल.

२६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये थिविमहून दर शनिवारी सकाळी ११.३० वाजता गाडी पनवेलसाठी सुटेल. ही गाडी पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता पोहोचेल, तर २६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वाजता थिविमसाठी सुटेल. ही गाडी थिविम येथे दुसºया दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल.

तात्पुरत्या कालावधीसाठी एक्स्प्रेसला जादा डबे

दवाळीमधील गर्दी विभाजनासाठी एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ११०८५/८६, ११०९९/१११०० या लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर गाडीला द्वितीय श्रेणीचा एक एसी डबा आणि तृतीय श्रेणीचे तीन एसी डबे जोडले जाणार आहेत.
गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेसला दर शनिवारी ११ जानेवारीपर्यंत जादा डबे जोडले जातील. गाडी क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेसला दर सोमवारी आणि बुधवारी ८ जानेवारीपर्यंत जादा डबे जोडले जातील, रेल्वेकडून सांगण्यात आले.

Web Title: Special trains of trains for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.