निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 06:25 IST2024-11-15T06:24:00+5:302024-11-15T06:25:03+5:30

निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना देखील या सेवांचा फायदा होणार आहे.

Special Trains of Central Railway for Elections | निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि पनवेल यादरम्यान धिम्या मार्गावर २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना देखील या सेवांचा फायदा होणार आहे.

विशेष लाेकलचे वेळापत्रक
- २० नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता सुटणाऱ्या गाड्या
- डाऊन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल.
- अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल -सीएसएमटी

२० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उशिरा सुटणाऱ्या गाड्या

डाऊन मार्गावर
सीएसएमटी - कल्याण : १:१०, २:३०.
सीएसएमटी - पनवेल : १:४०, २:५०. 

अप मार्गावर
कल्याण - सीएसएमटी : १:००, २:००.
पनवेल -सीएसएमटी : १.००, २:३०.

Web Title: Special Trains of Central Railway for Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.