परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:25 IST2025-09-20T06:24:48+5:302025-09-20T06:25:06+5:30
पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले.

परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
मुंबई : शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली आहे.
पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते. अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले.
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
बावनकुळेंनीही फटकारले
पडळकर कथित विधानावरून राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून पडळकरांना उघडपणे फटकारले. ही भाजपची संस्कृती नाही, असे ते गडचिरोली येथे बोलताना म्हणाले.
पडळकर यांचा पलटवार
यावर आ. पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा पवार यांनी त्यांना फोन केला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी वाईट बोलले गेले तेव्हा फोन केला होता का?
राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलींची : मुख्यमंत्री
नेपाळमध्ये जेन-झीने केले ते भारतात झाले पाहिजे, इथली व्यवस्था तरुणाईने उलथवली पाहिजे अशा आशयाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाषा ते अर्बन नक्षल असल्याचा पुरावा देणारी आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
पत्रकारांच्या प्रश्नात फडणवीस म्हणाले की, जेन-झी आपल्याकडेही आहे; पण त्यांना स्टार्टअपच्या माध्यमातून देशाला पुढे न्यायचे आहे. तंत्रज्ञानस्नेही अशा आपल्याकडील नव्या पिढीला प्रगती करायची आहे. अर्बन नक्षलवादी विचारांचे सल्लागार राहुल गांधींभोवती आहेत. त्यामुळे देशातील तरूणाईच्या मनात प्रगतीची कोणती स्वप्ने आहेत हे राहुल गांधी यांना कळत नाही.