'स्पा'च्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून चार मुलींची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 19:47 IST2020-11-08T19:47:28+5:302020-11-08T19:47:46+5:30
गोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता.

'स्पा'च्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून चार मुलींची केली सुटका
ठळक मुद्देगोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता.
मीरारोड - मीरारोडच्या जीसीसी क्लब जवळ टोरर्स स्पा वर पोलिसांनी छापा टाकून तेथील वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे . पोलिसांनी चार पीडित मुलींची सुटका करून एका आरोपीस अटक केली आहे .
गोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश भामरे व इतर कर्मचारी यांनी सापळा रचला . बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री पटताच धाड टाकून तोरोस अब्राहम मगरदीचीयन (३२) या आरोपीस अटक केली . मुलींच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता .