Join us

दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 16:15 IST

Deep Depression : अतिवृष्टी शक्यता आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून, त्याचा परिणाम म्हणून बुधवार, गुरुवार दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

-----------------------

राज्यात मराठवाडाच्या व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग 

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्र