Join us  

रशियात अडकलेल्या 101 भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदनं केलं 'एयरलिफ्ट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:43 PM

कोरोना व्हायरसच्या संकटात देशभरातील अनेक भागांत अडकलेल्या मजूरांना, गरीबांना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं मदत केली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात देशभरातील अनेक भागांत अडकलेल्या मजूरांना, गरीबांना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं मदत केली आहे. देशातील जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदतीची मागणी झाली आणि त्यानं जवळपास प्रत्येकाला मदत केली. आता परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही सोनू सूदनं मदत केली आहे. रशियात अडकलेल्या 101 वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदनं विमानाची सोय केली आणि ते सर्व बुधवारी मायदेशात परतले.

रशियात अडकलेले 100 विद्यार्थी चेन्नईला, तर 1 विद्यार्थी दिल्लीत दाखल झाला आहे. आता हे सर्व विद्यार्थी विविध शहरात क्वारंटाईन झाले आहे. यापैकी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की,''हे चार्टड विमान 200 प्रवासांसाठीचं होतं आणि आम्ही फक्त 101 जणं होतं. त्यामुळे ते आम्हाला मायदेशात आणतील की नाही, याबाबत साशंकता होती. पण, सोनू सूद यांनी उर्वरित पैसे देऊन पूर्ण  चार्टड प्लेन बूक केलं.''

''आम्ही वंदे भारत विमानानं मॉक्सो येथून 3 जुलैला येणार होतो, परंतु आमचं प्रशिक्षण 6 जुलैला संपलं. त्यामुळे आम्ही ते विमान पकडू शकलो नाही. 1 ऑगस्टला आमचा व्हिसाही संपला, परंतु रशीयन सरकारनं विद्यार्थ्यांना सप्टेंबरपर्यंत राहण्याची मूभा दिली होती. पण, तेथे अन्य आव्हान होती आणि त्यामुळे आम्ही तणावात होतो,''असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

वाढदिवसानिमित्त सोनू सूदची मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी 

दरम्यान, रिअल लाईफमधील नायकाला लोकं सुपरहिरो म्हणू लागली आहेत. त्यानं स्थलांतरित मजुरांसाठी 'प्रवासी रोजगार.कॉम' ही वेबसाईट सुरू केली आहे आणि त्यातून तो 3 लाख मजुरांना नोकरी देणार आहे. ''माझ्या वाढदिवसाला स्थलांतरित बांधवांसाठी 3 लाख नोकरी देण्यासाठी PravasiRojgar.comचा माझा संकल्प... या नोकरींत तुम्हाला PF, ESI आणि अन्य सुविधाही मिळणार आहेत,''असे त्याने ट्विट केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. सोनू सूद बेरोजगार तरुणांना नोकरी देणार आहे. त्याची ही वेबसाईट कोणतही शुल्क आकारत नाही. या वेबसाईटवर 450 कंपन्या नोकरी देणार आहेत आणि आतापर्यंत 1 लाख लोकांना नोकरी दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी 1800 121 664422  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा 

राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य

Apple iPhone 11 वर बंपर डिस्काऊंट; अ‍ॅमेझॉनवर मिळतेय घसघशीत ऑफर!

टॅग्स :सोनू सूदरशियाविद्यार्थी