जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:04 AM2020-01-08T10:04:02+5:302020-01-08T10:04:06+5:30

नागरिकत्व दूरस्ती कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळले होते. देशातील तरुणाई

Sonalee kulkarni critics on modi sarakar on JNU And CAA | जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा'

जेएनयुच्या समर्थनार्थ 'अप्सरा आली'... सोनालीच्या कमेंटनं ट्विटरवर उडला 'धुरळा'

Next

मुंबई - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. त्यानंतर, आता मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका सोनाली कुलकर्णीनेही जेएनयुतील हल्ल्याचा निषेध नोंदवत सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे सोनालीने एकाच दगडात दोन पक्षा मारले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.   

नागरिकत्व दूरस्ती कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळले होते. देशातील तरुणाई आणि अल्पसंख्याक नागरिक रस्त्यावर उतरुन सीएए कायद्याला विरोध करत होते. मात्र, जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाकडून हल्ला करण्यात आला अन् सीएएचा मुद्दा काहीसा मागे पडला. मात्र, जेएनयुवरील हल्ल्याचा संदर्भ देत नटरंगफेम सोनाली कुलकर्णीने केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने नुकताच नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत पारित केला आहे. त्यानुसार, इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देण्यात येणार आहे, सोनालीने हाच मुद्दा उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं.  

''तुम्ही देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाहीत, अन् दुसऱ्या देशातील अल्पसंख्यांना सुरक्षा देण्याच्या गोष्टी करता'' असे ट्विट सोनालीने केले आहे. आपल्या ट्विटमधून सोनालीने जेएनयुवरील हल्ल्याचा एकप्रकारे निषेध करताना, सीएए कायद्यावरही टीका केली आहे. अभिनेत्री सोनालीनेही स्पष्ट भूमिका घेत जेएनयुतील हल्ल्यावरुन सरकारला लक्ष्य केलं.  

दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केलं आहे. दीपिकानंतर आता सोनालीच्या ट्विटवरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच, मी धुरळा पाहायला जाणार होतो, पण आता जाणार नाही, अशीही कमेंट एकाने केली आहे. 

Web Title: Sonalee kulkarni critics on modi sarakar on JNU And CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.