वरळीतील कामगार विमा रुग्णालयाचा सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 04:00 PM2022-03-16T16:00:42+5:302022-03-16T16:02:34+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Social Initiative of State Workers Insurance Hospital | वरळीतील कामगार विमा रुग्णालयाचा सामाजिक उपक्रम

वरळीतील कामगार विमा रुग्णालयाचा सामाजिक उपक्रम

Next

मुंबई- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, वरळी यांनी देखील के. जे. सोमय्या रुग्णालय व रक्तदान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिर डॉ. गणेश जाधव (वैद्यकीय अधिक्षक ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरात राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय वरळी व जीवनदायी आरोग्य भवन वरळी येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दिवसभरात एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान या ठिकाणी केले. या रक्तदान शिबिरात कार्यालयीन अधिक्षक संजय नामये यांच्यासह स्नेहा सावंत (मेट्रन), के. जे . सोमय्या रुगणालय व रक्तदान केंद्र येथील कर्मचारी आणि राज्य कामगार विमा योजना सोसायटी वरळी येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Web Title: Social Initiative of State Workers Insurance Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.