..."तर त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 07:28 AM2020-09-14T07:28:35+5:302020-09-14T08:24:20+5:30

आपल्या सैनिकी पेशाला जागून संबंधित अधिकाऱ्यांनी गलवानमध्ये २० जवानांच्या ह्त्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे होती, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे

"So they should have demanded the resignation of the President, the Prime Minister and the Defense Minister." | ..."तर त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती"

..."तर त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती"

Next
ठळक मुद्देमाजी नौदल अधिकाऱ्याला झालेल्या या मारहाणीवरून सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून टीका उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संबंधित माजी नौदल अधिकाऱ्यालाही टोलाघटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कुणी शिकवले नव्हते काय?

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हायरल केल्याने नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यानंतर या मारहाणीवरून सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून टीका करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संबंधित माजी नौदल अधिकाऱ्यालाही टोला लगावण्यात आला आहे. आपल्या सैनिकी पेशाला जागून संबंधित अधिकाऱ्यांनी गलवानमध्ये २० जवानांच्या ह्त्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे होती, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.

सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, चीनच्या सीमेवर २० जवान शहीद झाले त्यांच्या हत्येचा बदला अद्यापही घेण्यात आलेला नाही. चीनची अरेरावी कायम आहे. हे जे माजी नौदल अधिकारी आहेत. त्यांच्यांवरील हल्ल्यासंदर्भात भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता या माजी नौदल अधिकाऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापुढे हे महाशय जी काही मागणी करतील ती करुद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी गलवानमध्ये २० जवानांच्या ह्त्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे होती. पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे. तो पाहता ऑलिम्पिकमध्ये पोरखेळ प्रकारात एखादं सुवर्णपदक हमखास मिळेल.

मुंबईत मदन शर्मा नामक एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. याचे समर्थन कुणी करणार नाही. त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण हेजे कोणी निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कुणी शिकवले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमावता, सुखाने जगता, त्या राज्यातील नेत्यांविषयी काही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कुणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार स्वातंत्र्यावर घाला, वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आले. तसेच भाजपाशासित राज्यात माजी सैनिकांवर झालेले हल्ले आणि भाजपा कार्यकर्त्यांनी माजी सैनिकांवर केलेले हल्ले यावरून भाजपाला टोला लगावला आहे.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत ८० हजार मृत्यू झाले आहेत. राज्याराज्यातील कोरोनाचा कहर संपता संपत नाही. अशा पार्श्वभूमीवर आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. देशापुढे प्रश्न गंभीर आहेत. लडाख अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चिंतेचा चिनी पारा रोज वाढत आहे. काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून छुपे सर्जिकल स्ट्राइक रोज सुरू आहेत. अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेच आहे. पण लॉकडाऊन, नोटाबंदीमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात गांभीर्यपूर्ण चर्चा होणार काय, असा सवालही सामनामधून विचारण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: "So they should have demanded the resignation of the President, the Prime Minister and the Defense Minister."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.