खेळाडूंसाठी झोप, निरोगी मनाचे महत्त्व! कामगिरी आणि ताकद वाढवण्यासाठी हा आहे नैसर्गिक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:41 IST2025-09-29T13:40:35+5:302025-09-29T13:41:03+5:30
खेळाडूंच्या यशामागे केवळ कठोर परिश्रम, प्रशिक्षण किंवा शारीरिक ताकदच नसते; तर पुरेशी झोप आणि निरोगी मन हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे.

खेळाडूंसाठी झोप, निरोगी मनाचे महत्त्व! कामगिरी आणि ताकद वाढवण्यासाठी हा आहे नैसर्गिक उपाय
मैथिली अगस्ती
क्रीडा समुपदेशक
खेळाडूंच्या यशामागे केवळ कठोर परिश्रम, प्रशिक्षण किंवा शारीरिक ताकदच नसते; तर पुरेशी झोप आणि निरोगी मन हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. शरीराला पुनर्प्राप्ती आणि ताकद मिळवून देण्यासाठी झोप ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. अपुरी झोप घेतल्यास खेळाडूंची प्रतिक्रिया वेळ कमी होते, लक्ष विचलित होते आणि दुखापतींचा धोका वाढतो. याउलट पुरेशी व नियमित झोप घेतल्यास स्नायू लवकर दुरुस्त होतात, ऊर्जा पातळी वाढते आणि स्पर्धात्मक कामगिरीत वाढ दिसून येते. त्याचप्रमाणे निरोगी मन हे खेळाडूंच्या मानसिक ताकदीचे मूळ आहे.
खेळाडूंसाठी काही टीप्स
झोपेला प्राधान्य द्या : चांगल्या पुनर्प्राप्ती आणि कामगिरीसाठी दररोज रात्री ७-९ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
माइंडफुलनेस आणि तणाव व्यवस्थापन : निरोगी मन राखण्यास ध्यान, खोल श्वास, व्हिजुअलायझेशन यासारख्या तंत्रांचा सराव करा.
संतुलित दिनचर्या : प्रशिक्षण, विश्रांती आणि मानसिक स्वास्थ्य यांचे संतुलन राखणारी दिनचर्या तयार करा.
चांगली झोप व निरोगी मनाला प्राधान्य देऊन खेळाडू कामगिरी सुधारू शकतात.चांगल्या झोपेचे महत्त्व
पुनर्प्राप्ती झोप शरीराला शारीरिक तणावातून बरे होण्यास आणि स्नायू दुरुस्त करण्यास मदत करते.
कामगिरी वाढवणे : पुरेशा झोपेमुळे प्रतिक्रिया वेळ, वेग, अचूकता आणि एकूण क्रीडा कामगिरी सुधारते.
दुखापतीपासून बचाव : झोपेच्या कमतरतेमुळे लक्ष आणि समन्वय कमी झाल्यामुळे दुखापतींचा धोका वाढू शकतो.
निरोगी मनाचे महत्त्व
लक्ष आणि एकाग्रता : निरोगी मन खेळाडूंना लक्ष केंद्रित ठेवण्यास, जलद निर्णय घेण्यास आणि दबावरहित कामगिरी करण्यास मदत करते.
तणाव व्यवस्थापन : निरोगी मानसिकता खेळांशी संबंधित तणाव, चिंता आणि दबाव व्यवस्थापित करण्यास मदत करते.
प्रेरणा आणि आत्मविश्वास : सकारात्मक मानसिकता प्रेरणा, आत्मविश्वास आणि एकूण कामगिरीला चालना देणारी आहे.