Join us

‘सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची कार पलटी केली होती, आता…’ मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:34 IST

Sanjay Raut Vs MNS: मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यातील कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवल्यापासून संजय राऊत मनसेच्या निशाण्यावर आले आहेत. आता मनसे नेते दररोज वेगवेगळी विधाने करून संजय राऊत यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यातील कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवल्यापासून संजय राऊत मनसेच्या निशाण्यावर आले आहेत. आता मनसे नेते दररोज वेगवेगळी विधाने करून संजय राऊत यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी १६ वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत संजय राऊतांना डिवचले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांची कार पलटी केली होती. त्यावरूनच संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती. या निवडणुकीतही आम्हीच तुमची गाडी पलटी करणार, इशारा संदीप देशपांडे यांनी या ट्विटमधून दिला.

दरम्यान, याआधीही संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. त्यात संदीप देशपांडे म्हणाले होते की, ‘जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहीना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर "सामना कार"रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. "झुकेगा नहीं साला", असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले होते. 

टॅग्स :संजय राऊतसंदीप देशपांडेमनसेशिवसेना