डिलिव्हरी बॉयच्या बहिणीचं लग्न अन् झोमॅटोनं ब्लॉक केलं अकाऊंट; आता, कंपनीने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:48 IST2024-03-29T17:45:33+5:302024-03-29T17:48:24+5:30
सोशल मीडियावर झोमॅटो बायचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हा युवक कंपनीने आपलं अकाऊंट ब्लॉक केलं असल्याचे सांगत गाऱ्हाणं मांडत आहे.

डिलिव्हरी बॉयच्या बहिणीचं लग्न अन् झोमॅटोनं ब्लॉक केलं अकाऊंट; आता, कंपनीने घेतली दखल
मुंबई - फूड ऑन डिलिव्हरी संकल्पनेतून सुरू झालेल्या झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो खासगी जॉब सुरू झाले आहेत. झोमॅटो कंपनीकडून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि तत्काळ सेवा देण्यासाठी डिलिव्हरी बॉयची टीम कार्यरत आहे. याच डिलिव्हरी बॉयच्या अनेक कथा आणि घटना अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. याच महिन्यात झोमॅटोने प्युअर व्हेज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या ड्रेसकोडवरुनही कंपनी चर्चेत होती. आता, कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयच्या व्हिडिओमुळे कंपनीची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर झोमॅटो बायचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हा युवक कंपनीने आपलं अकाऊंट ब्लॉक केलं असल्याचे सांगत गाऱ्हाणं मांडत आहे. पुढील काही दिवसांत माझ्या बहिणीचं लग्न असून कंपनीने अकाऊंट ब्लॉक केल्याने पैशांची तारांबळ उडली, म्हणून हा झोमॅटो बॉय रडत आहे. तर, रस्त्यावरु येणाऱ्या-जाणाऱ्यांना बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची विनंतीही करत आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजर्सने हा व्हिडिओ ट्विटवरुन शेअर केला होता. त्यानंतर, या बॉयची केवलवाणी कहानी ऐकून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी झोमॅटो कंपनीला टॅग करुन संबंधित व्हिडिओवरुन जाबही विचारला.
We deeply value our delivery partners, and we understand the impact that actions like blocking an ID can have. Rest assured, we take such matters seriously. We assure you, we'll look into this. Our delivery partners are as important to us as our customers.
— Zomato Care (@zomatocare) March 28, 2024
झोमॅटो बॉयच्या या व्हिडिओची आता कंपनीने दखल घेतली आहे. नेटीझन्सने जाब विचारल्यानंतर कंपनीने ट्विट करुन संबंधित प्रकरणाची शहानिशा करण्यात येईल, असे सांगितले आहे. आमच्या डिलिव्हरी पार्टनरच्या योगदानाची आम्हाला किंमत आहे. एखाद्याचा आयडी ब्लॉक केल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचीही आपणास जाणीव असल्याचं झोमॅटोने म्हटलं आहे. या प्रकरणाची गांभीर्याने पाहणी करू, असं आश्वासन कंपनीने सोहम यांच्या ट्विटरला रिप्लाय देत म्हटलं आहे.
दरम्यान, सोहम याने ट्विटरवरुन क्यूआर कोडही शेअर केला आहे. ज्याद्वारे झोमॅटो बॉयच्या बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्याची विनंती करण्यात आली आहे.