धक्कादायक! रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 19:46 IST2020-05-27T19:43:00+5:302020-05-27T19:46:48+5:30
उपचारादरम्यान 11.15 वाजता त्या मयत झाल्याचे डाॅ.हेमांगी यांनी घोषित केले. जे.जे.रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला आहे.

धक्कादायक! रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू
ठळक मुद्देतळ मजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावर जात असताना ही घटना घडली आहे.आज २७ मे रोजी 10.30वाजताच्या सुमारास सेंट जाॅर्जस रूग्णालय येथे महिला सफाई कामगार गीता प्रविण वाघेला (४३) या जुन्या वापरत्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होत्या.
मुंबई - सेंट जॉर्ज रुग्णालयातील ४३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविन्यात आला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. तळ मजल्यावरुन तिसऱ्या मजल्यावर जात असताना ही घटना घडली आहे.
आज २७ मे रोजी 10.30वाजताच्या सुमारास सेंट जाॅर्जस रूग्णालय येथे महिला सफाई कामगार गीता प्रविण वाघेला (४३) या जुन्या वापरत्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होत्या. लिफ्टमधील एक लाकडी फळी निघाली असून त्या बाहेर पहात असताना यांत्रिक लोखंडी भाग डोक्याला लागून गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान 11.15 वाजता त्या मयत झाल्याचे डाॅ.हेमांगी यांनी घोषित केले. जे.जे.रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला आहे.
Coronavirus : मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
तळोजा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या