Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक...! महिलेला जेवणातून नशा देऊन केला अनैसर्गिक अत्याचार; मारहाण करत पायाला दिले सिगारेटचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 20:00 IST

३२ वर्षीय पीडित महिला तिच्या मैत्रीणीसह १२ सप्टेंबरला दोन मित्रांच्या नालासोपाऱ्यातील घरी गेली होते...

मंगेश कराळे -नालासोपारा - मिरा रोड येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित महिलेला जेवणातून नशेचा पदार्थ देऊन मारहाण करत अनैसर्गिक संभोग केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. एवढेच नाही, तर आरोपीने पीडित महिलेला चक्क पायावर सिगारेटचे चटकेही दिले आहे. पीडित महिलेने शनिवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघड झाल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. 

३२ वर्षीय पीडित महिला तिच्या मैत्रीणीसह १२ सप्टेंबरला दोन मित्रांच्या नालासोपाऱ्यातील घरी गेली होते. मैत्रिणीसह दोन्ही आरोपींनी संगनमत करून १२ सप्टेंबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास अर्नाळा बीचवर फिरायला जायचे, असे सांगून पीडित महिलेला अर्नाळा येथील एका हॉटेलमध्ये नेले. पीडित महिला बियर पिल्याचा गैरफायदा घेत, तिच्या जेवणात नशेचा पदार्थ टाकून फार्म हाऊसच्या मालकाने ठोशाबुक्यांनी तिला मारहाण केली. मैत्रिणीच्या मित्राने १३ सप्टेंबरला सकाळी त्याच्या घरी आणून लाकडी दांडक्यांनी पाठीवर मारहाण केली. आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करून दुसऱ्या आरोपीने पायावर सिगारेटचे चटके दिले. 

याशिवाय यावेळी पीडित महिलेचे २५ हजार ५०० रुपये आणि घड्याळ हरवले असल्याचे शनिवारी नालासोपारा पोलिसांना सांगून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिची मैत्रिण, तिचे दोन मित्र, हॉटेल व फार्म हाऊसचे मालक, अशा पाच आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीविनयभंगपोलिस