मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 09:00 PM2020-02-03T21:00:45+5:302020-02-03T21:11:22+5:30

शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा

shiv senas number of corporators will increase by one | मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार

मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ एकनं वाढणार

Next

मुंबई- गेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 28 चे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजपत यादव यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचा निकाल आज सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वरणीता महाले यांनी दिला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या एकनाथ (शंकर) हुंडारे यांचा नगरसेवकपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

उद्या होणाऱ्या पालिकेच्या सर्व साधारण सभेत महापौर किशोरी पेडणेकर या  हुंडारे यांच्या नगरसेवकपदाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुंडारे यांच्या नगरसेवकपदामुळे आता पालिकेत अपक्षांच्या पाठिंब्यासह शिवसेनेचे संख्याबळ 96 होणार आहे. लोकमतने ऑगस्ट 2018 पासून या संदर्भात सातत्याने वृत्त दिले होते.

उपरोक्त निवडणुकी संदर्भात 18 व्या कोर्ट रूमच्या न्यायमूर्ती स्वरणीता महाले यांनी निवडणूक याचिका ७६/२०१७ आज आदेशिका प्रविष्ट प्रकरण निकाली काढले. एकनाथ (शंकर) हुंडारे यांना प्रभाग क्र. २८ चे नगरसेवक म्हणून घोषित करण्यासंदर्भात याचिका मान्य केली आहे. तसेच हुंडारे यांना नगरसेवक घोषित करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले. या प्रकरणी वकील रामचंद्र मेंदडकर, चिंतामणी भनगोजी, सुनील कोकणे, प्रियंका शॉ व  कोमल गायकवाड यांनी हुंडारे यांची बाजू मांडली.
 

Web Title: shiv senas number of corporators will increase by one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.