अदानींविरोधातील ठाकरे गटाच्या महामोर्चाला सुरुवात, शिवसैनिकांसह मविआ आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 04:20 PM2023-12-16T16:20:55+5:302023-12-16T16:27:22+5:30

Dharavi Bachav Mahamorcha: अदानी उद्योगसमुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाने पुकारलेल्या महामोर्चाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे.

Shiv Sena UBT's Mahamorcha against Adani begins, Shiv Sainiks along with Maviya and Left party activists crowd | अदानींविरोधातील ठाकरे गटाच्या महामोर्चाला सुरुवात, शिवसैनिकांसह मविआ आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी

अदानींविरोधातील ठाकरे गटाच्या महामोर्चाला सुरुवात, शिवसैनिकांसह मविआ आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी

अदानी उद्योगसमुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाने पुकारलेल्या महामोर्चाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. धारावी टी जंक्शनपासून सुरू झालेला हा मोर्चा अदानींच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानींनी करण्याऐवजी तो स्वत: सरकारने करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, हामोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमून द्यावी.  धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याबरोबरच निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत देण्यात यावं.

धारावीतील झोपडपट्ट्यांमधून अनेक छोटेमोठे व्यवसाय चालतात. त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. तसेच धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करून, निवासी, अनिवासी रहिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात करावी, तसेच प्रकल्पाचं स्वरूप समजावं यासाठी मास्टर प्लान आधीच जाहीर करून सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती.

Web Title: Shiv Sena UBT's Mahamorcha against Adani begins, Shiv Sainiks along with Maviya and Left party activists crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.