Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 09:24 IST

Uddhav Thackeray- Raj Thackeray Rally: त्रिभाषा धोरणातील हिंदीच्या सक्तीविरोधातील निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा आज मुंबईत विजयी मेळावा होणार आहे.

त्रिभाषा धोरणातील हिंदीच्या सक्तीविरोधातील निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा आज मुंबईत विजयी मेळावा होणार आहे. हा राजकीय पक्षाचा मेळावा नाही. त्यामुळे या मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा पक्षचिन्ह नको. फक्त मराठीचा अजेंडा असू द्या, असे आवाहन ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना केले. याचपार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज घातलेल्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून स्वत:चा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये संदीप देशपांडेंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. या टी-शर्टच्या उजव्या बाजुला महाराष्ट्राचा नकाशा आणि डाव्या बाजूला 'आवाज मराठीचा', असा मजकूर लिहिले आहे. तर, समोर बाराखडी लिहिलेली आहे.

मराठी बोलण्याच्या मद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये गुरूवारी व्यापारी संघटनेने मोर्चा काढला होता. यावर बोलताना संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना चांगलाच दम दिला. "व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकावीच लागेल, अन्यथा त्यांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही", असे ते म्हणाले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रराजकारणमुंबईमनसेशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरे