Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:04 AM2024-03-26T11:04:59+5:302024-03-26T11:09:22+5:30

Uddhav Thackeray : या यादीत कोणत्या नेत्यांना संधी मिळणार कोणत्या नेत्यांना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही आज उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे. 

shiv sena Thackeray group will announce candidates for Lok Sabha today, 15 leaders will get a chance | Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

Uddhav Thackeray ( Marathi News ) -  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली असून काही मतदारसंघांसाठी बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बैठका सुरू आहेत. आज ठाकरे गट १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काल माध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती. 

या यादीत कोणत्या नेत्यांना संधी मिळणार कोणत्या नेत्यांना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही आज उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे. 

ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार

नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व ), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य), अमोल कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), अनंत गीते (रायगड), चंद्रहार पाटील (सांगली), हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला बाहेरुन पाठिंबा, संजोग वाघेरे (मावळ) या नेत्यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

तर दुसरीकडे, आज महायुतीमधील शिवसेना शिंदे गटही आज उमेदावारांची घोषणा करु शकते. नाशिक, ठाणे जागेवरुन गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत. 

शिवसेना (शिंदे गटाचे) संभाव्य उमेदवार

राजू पारवे (रामटेक), संजय राठोड (वाशिम-यवतमाळ), प्रताप सरनाईक (ठाणे), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), श्रीरंग बारणे (मावळ), संजय मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील माने (हातकणंगले), प्रतापराव जाधव (बुलढाणा), सदाशिव लोखंड (शिर्डी) या नेत्यांना लोकसभेसाठी संधी मिळू शकते. 

Web Title: shiv sena Thackeray group will announce candidates for Lok Sabha today, 15 leaders will get a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.