Join us  

‘... मग राज ठाकरेंच्या नावानं शिमगा का?’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 11:39 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेसह भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आता संपला असला तरी महाराष्ट्रातील अजून 4 टप्पे बाकी आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार प्रचारासाठी धावपळ करत आहेत. 

यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेसह भाजपावर निशाणा साधला आहे. 1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. मात्र, काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता, त्यांचाच वारसा राज ठकारे चालवत आहेत. मग त्यांच्या नावाने शिमगा का करता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला केला आहे. 

जितेंद्र आव्हाड ट्विटरवर म्हणाले, '1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिलं होत. त्यांचाच कित्ता गिरवत आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीत, तसेच त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांसाठी ही खास माहिती…!'

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, यासाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा प्रचारासाठी सभाही घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने एकप्रकारे आघाडीला साथ दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शिवसेना-भाजपाकडून टीका होत आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपालोकसभा निवडणूकशिवसेना