महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:31 PM2021-10-02T13:31:47+5:302021-10-02T13:35:01+5:30

Shivsena Honoured lady Police : त्यांची लंडन मॅरेथॅानसाठी देखिल निवड झाली आहे. 

Shiv Sena felicitates Lady police Priyanka Naukudkar | महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव

महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव

googlenewsNext
ठळक मुद्दे यावेळी विलेपार्ले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे, पोलिस अधिकारी राजेंद्र काणे, प्रकाश सपकाळ, आनंद पाठक, पोलिस कॉन्स्टेबल योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई-विलेपार्ले पोलिस स्टेशनच्या महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांनी मुंबई ते गोवा  557 किलोमीटर अंतर 52 तास 30 मिनीटांत 2020 सालात पूर्ण केले होते. त्यांच्या या विक्रमाची निवड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांची लंडन मॅरेथॅानसाठी देखिल निवड झाली आहे. 

राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रियंका नौकूडकर यांच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्धल शिवसेनेतर्फे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात जाऊन शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवसेनेने सत्कार केल्याबद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 यावेळी विलेपार्ले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे, पोलिस अधिकारी राजेंद्र काणे, प्रकाश सपकाळ, आनंद पाठक, पोलिस कॉन्स्टेबल योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena felicitates Lady police Priyanka Naukudkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.