महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:35 IST2021-10-02T13:31:47+5:302021-10-02T13:35:01+5:30
Shivsena Honoured lady Police : त्यांची लंडन मॅरेथॅानसाठी देखिल निवड झाली आहे.

महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव
मुंबई-विलेपार्ले पोलिस स्टेशनच्या महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांनी मुंबई ते गोवा 557 किलोमीटर अंतर 52 तास 30 मिनीटांत 2020 सालात पूर्ण केले होते. त्यांच्या या विक्रमाची निवड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांची लंडन मॅरेथॅानसाठी देखिल निवड झाली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका नौकूडकर यांच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्धल शिवसेनेतर्फे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात जाऊन शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवसेनेने सत्कार केल्याबद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विलेपार्ले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे, पोलिस अधिकारी राजेंद्र काणे, प्रकाश सपकाळ, आनंद पाठक, पोलिस कॉन्स्टेबल योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.