BMC Budget 2022: “मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:02 PM2022-02-03T16:02:05+5:302022-02-03T16:03:03+5:30

BMC Budget 2022: यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

shiv sena aaditya thackeray reaction over bmc budget 2022 | BMC Budget 2022: “मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत”: आदित्य ठाकरे

BMC Budget 2022: “मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत”: आदित्य ठाकरे

Next

मुंबई: जगभरात नाव असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सादर करण्यात आला. सन २०२२-२३ या आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प असून, तो आतापर्यंतच्या पालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबईचेच असल्याने पहिल्यांदाच अर्थसंकल्पातून चांगल्या गोष्टी दिसत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर होत असलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांचा समाचार घेतला. केंद्र सरकारच्या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले, हे विरोधकांनी सांगावे. लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर ठाम विश्वास आहे. यामुळे विरोधकांचे नैराश्य वाढत चालले आहे. दररोज त्यांचे बोलणे, आरोपांची पातळी आपल्याला कळतेच. नैराश्यातून ही टीका होत आहे, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. 

पहिल्यांदाच चांगल्या गोष्टी अर्थसंकल्पात दिसतायत

आत्ताचे महानगरपालिकेचे बजेट हे एका अत्यंत संवेदनशील, प्रगतीशील राज्याच्या राजधानीचे आहे. यात महिलांसाठी, पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद आहे. एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे जाणे गरजेचे आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, ते या अर्थसंकल्पातून दिसत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात १७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामध्ये, मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठीही भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी रस्ते, पुलनिर्मित्ती, नद्यांसाठी, मलनि:सारण, घनकचरा, रुग्णालये अशा विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. 
 

Web Title: shiv sena aaditya thackeray reaction over bmc budget 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.