Join us  

...त्यापेक्षा सरकारशी संबंध न ठेवायचं ठरवलं; शरद पवारांनी उघड केली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 5:04 PM

महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल मला स्वत:ला काही शंका वाटत नाही.

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार मी स्थापन करुन दिलं. तसेच आता सरकारचं काम व्यवस्थित सुरु असल्यामुळे मी लांब झालो असल्याचे सांगत माझ्या हातात या सरकारचे रिमोट नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल मला स्वत:ला काही शंका वाटत नाही. तसेच स्थापन झालेलं सरकार संमिश्र सरकार असून हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. तसेच सरकारचं काम व्यवस्थित सुरु असल्यामुळे आता मी लांब झालो असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सरकारला माझी गरज लागली तर उभं राहण्याव्यतिरिक्त सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात, शिवसेना म्हणून आमचा कधीही संपर्क आला नाही, बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले. 

दरम्यान, फडणवीस सरकारचे निर्णय बदलण्याबाबत शरद पवार म्हणाले की, आंध्र प्रदेशात पाहिलं असेल, जुन्या सरकारचे निर्णय बदलले की त्यातून चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो, उद्योगधंद्यामध्ये फरक पडतो पण महाराष्ट्रात जुन्या सरकारचे निर्णय बदलले पण त्याचा परिणाम राज्याच्या हितावर होईल असं नाही असं सांगत त्यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयांची पाठराखण केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा...

शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे

टॅग्स :शरद पवारमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस