कोयत्याचा धाक दाखवणाऱ्यास बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:25 IST2024-05-19T15:25:23+5:302024-05-19T15:25:55+5:30
डी.एन. नगर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असलेल्या मंगेश राजणे (३८) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

कोयत्याचा धाक दाखवणाऱ्यास बेड्या
मुंबई : ‘आज एक एक को मार डालूंगा किसी को नही छोडूंगा’, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या व्यक्तीला अंधेरीत अटक करण्यात आली आहे. फरदीन शेख ऊर्फ मोगली (२३) असे या आरोपीचे नाव आहे.
डी.एन. नगर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असलेल्या मंगेश राजणे (३८) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
१६ मे रोजी रात्री उशीरा गिल्बर्ट हिल रोड परिसरात एक व्यक्ती कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती डीएन नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे एक व्यक्ती ‘आज एक एक को मार डालूंगा किसी को नही छोडूंगा’ असे म्हणत हातामध्ये धारदार कोयता घेऊन पादचाऱ्यांच्या अंगावर धावत असल्याचे दिसले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले.
फरदीन शेख असे त्याचे नाव असल्याचे चौकशीत समजले. त्याच्याकडे असलेला कोयताही हस्तगत करण्यात आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.