सात जलाशय तुडुंब; वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा; एकूण साठा ९८.८२ टक्के : यंदा उन्हाळ्यात कपातीची चिंता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:25 IST2025-09-18T11:24:47+5:302025-09-18T11:25:45+5:30

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढीव पाणीसाठ्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे अद्यापही मार्गी लावलेली नाहीत.

Seven reservoirs overflow; Water storage sufficient for the whole year; Total storage 98.82 percent: No worries about reduction this summer | सात जलाशय तुडुंब; वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा; एकूण साठा ९८.८२ टक्के : यंदा उन्हाळ्यात कपातीची चिंता नाही

सात जलाशय तुडुंब; वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा; एकूण साठा ९८.८२ टक्के : यंदा उन्हाळ्यात कपातीची चिंता नाही

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत रविवारी मध्यरात्रीपासून चांगला पाऊस पडल्याने सात तलावांत १४,३०,३४५ दशलक्ष लिटर (९८.८२ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ३५४ दिवस म्हणजे पुढील ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुरेल इतका  आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटापासून मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सप्टेंबरमधील पावसाचे महिन्यातील १३ दिवस बाकी आहेत. या दिवसांत पुरेसा पाऊस पडल्यास सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढीव पाणीसाठ्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा ही धरणे अद्यापही मार्गी लावलेली नाहीत.

मुंबई पालिका मुंबई शहराला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर, तर ठाणे, भिवंडी पालिका क्षेत्राला दररोज १८० दशलक्ष लिटर, असा एकूण ४,०३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते.

आतापर्यंत चार तलाव वाहिले ओसंडून

गेल्या तीन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे सातपैकी चार तलाव भरले आहेत. मोडक सागर तलाव हा ९ जुलैला, तानसा तलाव २३ जुलैपासून, १६ ऑगस्टला तुळशी तलाव आणि १८ ऑगस्टला विहार तलाव भरून वाहू लागला होता.

१६ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतचा पाणीसाठा

९८.८२%

साठा (द.श.लि)

१४,३०,३४५

२०२४

९८.७१%

(द.श.लि). साठा १४,२८,६९७

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सात तलावांत १,६४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जास्त आहे.

तलाव पाणीसाठा 

अप्पर वैतरणा

२,२५,११९

९९.१५

मोडक सागर

१,२८,९२५

१००

तानसा

१,४२,७६९

९८.४१

मध्या वैतरणा

१,९१,४५१

९८.९३

भातसा

७,०६,३३७

९८.५१

विहार

२७,६९८

१००

तुळशी

८,०४६ (द.श.लि)

१००

Web Title: Seven reservoirs overflow; Water storage sufficient for the whole year; Total storage 98.82 percent: No worries about reduction this summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.