Join us

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांचा शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 00:59 IST

आपल्या २ हजार कार्यकर्त्यांसह केला प्रवेश

मुंबई: पश्चिम उपनगरांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला धक्का बसला असून प्रभाग क्रमांक ४२ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांनी शुक्रवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील पहिल्या माजी नगरसेविका आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी त्यांनी आपल्या २ हजार कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, वैभव भरडकर आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आता पश्चिम उपनगरावर आपले लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर आगामी काळात मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळएकनाथ शिंदेमुंबईराष्ट्रवादी काँग्रेस