खळबळजनक! ४ वर्षाच्या चिमुकल्याचा सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:31 IST2020-03-10T20:25:57+5:302020-03-10T20:31:41+5:30
गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली.

खळबळजनक! ४ वर्षाच्या चिमुकल्याचा सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू
मुंबई - गोवंडीत सेप्टिक टॅंकमध्ये पडून ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. त्यामुळे गोवंडी परिसरात शोककळा पसरली आहे. आरिफ नसुल्ला शेख हा चार वर्षाचा मुलगा गोवंडी येथील शिवाजी नगर भागात खेळत असताना निर्माणाधीन असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना आज सायंकाळी ५. १७ वाजताच्या सुमारास घडली.
मुंबई - गोवंडीत सेप्टिक टॅंकमध्ये पडून ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) March 10, 2020
गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. ४ वर्षीय आरिफ खेळताना सेप्टिक टॅंकमध्ये पडला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले आणि त्या मुलाला बाहेर काढून उपचाराकरीत राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी गोवंडी पोलीस करीत आहे. तर ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.