मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘मुख्य आर्थिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परदेशी हे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली होती.
त्यानंतर त्यांची बदली मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र, कोरोना साथीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रात प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले होते.