Join us

अमित शाह यांचे आता मिशन मुंबई; एक तारखेला दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 08:15 IST

अमित शाह मुंबई आणि कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेतील.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते मुंबई आणि कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेतील.

शाह यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या बैठका घेतल्या होत्या. आता त्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. सोबतच ठाण्यासह कोकणात भाजपची काय परिस्थिती आहे, हेदेखील ते जाणून घेणार आहेत.

लोकसभेत भाजपला मुंबईत एकच जागा जिंकता आली.  मुंबई भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांची चर्चा आहे. यासंदर्भात शाह कशा कानपिचक्या देतात याची उत्सुकता आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अमित शाहभाजपा