Join us  

उद्धव ठाकरेंच्या 'नको ते' वरून संजय राऊतांनी मनसे-भाजपवर प्रश्न विचारला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 11:07 AM

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे.

ठळक मुद्देसत्तेत होतो त्याहून अधिक काळ विरोधी पक्षात घालवला. संपूर्ण देशामध्ये तुम्हाला काही स्थान नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुमचं रक्षण केलं होतं. संकटकाळाच्या मित्राला तुमचे सुखाचे दिवस आल्यावर तुम्ही सोडून दिलंत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने विश्वासघात केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकलले आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे, असा सवालही भाजपाला केला. 

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

यावर नको ते पक्ष म्हणजे मनसे का असे राऊत यांनी विचारत मनसे भाजपा एकत्र येण्याच्या बातम्या मिडीयामध्ये येत आहेत, यावर उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाणारे आहे. ''तो विषय गौण आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपा-मनसे युतीची खिल्ली उडविली. तसेच भाजपाचे जे कडवट विरोधक होते, जसे की नितीशकुमार, मुफ्ती, चंद्राबाबू, रामविलास ते तुम्हाला तुमच्या मांडीवर चालतात. पण कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जो तुमच्यासोबत संकटकाळात राहिला, तो मात्र नकोसा होतो, असा आरोप ठाकरे यांनी केला.

 तसेच सत्तेत होतो त्याहून अधिक काळ विरोधी पक्षात घालवला. जेव्हा संपूर्ण देशामध्ये तुम्हाला काही स्थान नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुमचं रक्षण केलं होतं. संकटकाळाच्या मित्राला तुमचे सुखाचे दिवस आल्यावर तुम्ही सोडून दिलंत. हे हिंदुत्व माझं नाही आणि मला मान्य नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपाला ठणकावले.

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजपसोबत पुन्हा युती कराल का? संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपामनसेराज ठाकरेसंजय राऊत