दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार - शिक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 06:28 AM2020-10-30T06:28:41+5:302020-10-30T06:29:06+5:30

School News : ​​​​​​​नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल.

Schools to start in phases after Diwali: Education Minister | दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार - शिक्षणमंत्री

दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार - शिक्षणमंत्री

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
 
नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. तसेच सरसकट शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय राज्यातील परिस्थिती आणि सरकारची तयारी पाहून राज्य सरकारने घ्यावा, असे केंद्राच्या अनलॉक ५ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्याप्रमाणे आढावा घेऊनच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Schools to start in phases after Diwali: Education Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.