Join us
Daily Top 2Weekly Top 5

Satej Patil: सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:38 IST

Satej Patil: पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

Satej Patil: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी  सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली

सतेज बंटी पाटील हे यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. २०१०-१४ च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. २०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन  अशाविविध विभागांची जबाबदारी  यशस्वीपणे पार पाडली आहे.

काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो, असे सतेज पाटील म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सतेज ज्ञानदेव पाटीलकाँग्रेस