Sanjay Raut On BMC Elections : एकीकडे राज्यभरात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असता, दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तयारीलाही वेग आला आहे. महायुती अन् महाविकास आघाडी, दोन्ही बाजूने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र, अशातच मनसेला सामावून घ्यायचे की नाही, यावरुन मविआत तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत.
मुंबईकाँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी काँग्रेस-मनसे आघाडी आधीच झाल्याचे सांगत मनसेसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पोस्टने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस. हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे, साठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा!” अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे आघाडीतील तणाव अधिकच प्रकर्षाने समोर आला आहे.
Web Summary : Differences emerge within the MVA regarding including MNS. While Mumbai Congress opposes it, some leaders hint at local alliances. Raut emphasizes Shiv Sena and MNS are already united, reflecting public sentiment, intensifying alliance tensions.
Web Summary : मनसे को शामिल करने को लेकर एमवीए में मतभेद सामने आए। मुंबई कांग्रेस के विरोध के बावजूद, कुछ नेताओं ने स्थानीय गठबंधन का संकेत दिया। राउत ने शिवसेना और मनसे के पहले से ही एकजुट होने पर जोर दिया, जिससे गठबंधन में तनाव बढ़ गया।