संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:45 IST2025-07-29T05:44:12+5:302025-07-29T05:45:35+5:30
मे २०२३ मध्ये एका सभेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख ‘साप’ म्हणून केला होता.

संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव सेनेचे खा. संजय राऊत यांच्या मानहानीप्रकरणी भाजप नेते व मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंविरोधात बजावलेले अजामीनपात्र वॉरंट माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने रद्द केले. नितेश राणे मंगळवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून त्यांची बाजू मांडतील, याच अटीवर दंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी हे वॉरंट रद्द केले.
जून महिन्यात राणे यांनी या खटल्यात अनुपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य न करता उलट ते सुनावणीला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले. मे २०२३ मध्ये एका सभेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख ‘साप’ म्हणून केला होता. या बदनामीकारक वक्तव्यासाठी राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत राऊत यांनी राणेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.