“२०२४ पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी, आमचे २२ खासदार होणार”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 12:36 PM2021-10-15T12:36:59+5:302021-10-15T12:37:43+5:30

आता आमचे २२ खासदार होतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

sanjay raut claims that till 2024 shiv sena will center in national politics | “२०२४ पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी, आमचे २२ खासदार होणार”: संजय राऊत

“२०२४ पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी, आमचे २२ खासदार होणार”: संजय राऊत

googlenewsNext

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) होत आहे. यातही राजकीय टोले, टीका यांची आतषबाजी पाहायला मिळेल, असे सांगितले आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सन २०२४ मध्ये शिवसेना देशाच्या राजकारण केंद्रस्थानी असेल आणि आमचे २२ खासदार निवडून येतील, असा दावा केला आहे. 

राज्याची सत्ता हाती आल्यापासून शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी प्रयत्न सुरु केलेला आहे. राष्ट्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण ४८ जागांपैकी १८ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता संपूर्ण देशाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना केंद्रस्थानी असेल. शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच. आता आमचे २२ खासदार होतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

शिवसेनेकडून राजकारणाला दिशा देणारे काम होईल

महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही. पण सर्व नियमाचे पालन करून मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी आणि उलाढाल यांच्यातून येणारा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येतो, असे RSS चे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असे होत असेल तर ते चुकीचे आहे. सरसंघचालक मोहन भागवत कोणाला जबाबदार धरणार आहेत. त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असते, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱ्याचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झाला आहे, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाचा समाचार घेतला.
 

Web Title: sanjay raut claims that till 2024 shiv sena will center in national politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.