Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवार DCMपदी, दोन्ही NCP विलीनीकरण, संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “भाजपाला…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:20 IST

Sanjay Raut PC News: अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut PC News:अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीची शक्यता होती, असे शरद पवार यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. आता पुढे काय होईल हे मी कसे सांगणार. मी यावर काय बोलणार. पण यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. या विषयावर मी सध्या काही बोलणार नाही. पण नक्की बोलेन, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाला दुखवटा, दु:ख याचा कधी संबंध आलेला नाही. त्यामुळे हे पक्ष मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना नेतृत्वहीन झाली, त्यामुळे शिवसेना गिळण्याची त्यांची फार मोठी योजना होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही योजना उधळून लावली, भाजपाला याचा राग आला असावा, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला. 

तटकरे, भुजबळ, पटेल यांनी वर्षा बंगल्यावर येऊन चर्चा केली

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत, ते सत्य आहे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी कुणालाच काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातंर्गत निर्णय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे राष्ट्रीय नेते तटकरे, भुजबळ, पटेल यांनी वर्षा बंगल्यावर येऊन चर्चा केली आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील अशा बातम्या वाचल्या. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलावे. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या दु:खातून सावरलेला नाही. अजितदादांच्या कुटुंबातील कोणी भाजपाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय आहे. कोणी त्यावर मत व्यक्त करण्याची ही अजिबात वेळ नाही. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता, असे संजय राऊतांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar as DCM, NCP Merger, Sanjay Raut's Big Revelation

Web Summary : Sanjay Raut claims BJP exploits misfortune. He suggests Ajit Pawar's faction is independent, and Sunetra Pawar's deputy CM role is an internal matter. He also mentioned discussions at Varsha Bungalow after Ajit Pawar's passing.
टॅग्स :संजय राऊतअजित पवारसुनेत्रा पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस