Sanjay Raut Bail:'दहावेळा तुरुंगात जायला तयार; बेईमानी आमच्या रक्तात नाही'; संजय राऊत पुन्हा कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:55 IST2022-11-10T13:53:21+5:302022-11-10T13:55:18+5:30
Sanjay Raut Bail:'ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, हा मला विश्वास होता.'

Sanjay Raut Bail:'दहावेळा तुरुंगात जायला तयार; बेईमानी आमच्या रक्तात नाही'; संजय राऊत पुन्हा कडाडले
Sanjay Raut Bail: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. काल जामीन मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
'परत तुरुंगात जायला तयार'
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, 'आम्ही एकच कुटुंब आहोत. मी तुरुंगात गेलो, तेव्हा हे सगळे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, हा मला विश्वास होता. आमची शिवसेना मूळ आहे. पक्षासाठी दहावेळा तुरुंगात टाकले तरी मी जायला तयार आहे. पक्षासाठी त्याग करायची वेळ आल्यावर त्याग करावा लागतो. मला जे काही मिळालं आहे, ते त्यांच्यामुळे मिळालं आहे. आम्ही कितीही मोठे झालो, तरी ज्यांनी दिलं, त्या पक्षाशी बेईमानी करणे, पाठीत खंजीर खुपसणे, हे आमच्या रक्तात नाही.'
'म्हणून फडणवीसांना भेटणार...'
राऊत पुढे म्हणतात की, 'शिवसेना एकच आहे, हा गट आणि तो गट नाही. शिवसेना एकच, ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आम्ही राजकीय लढाई लढू. मी फडणवीसांना भेटणार कारण काही राज्याचे प्रश्न आहेत. त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातीलकाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. त्यांना भेटण्यात काही गैर नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, पक्षाचे नाही,'
'मांडवली करायची असती तर...'
संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत, त्यावरुन प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत मांडवली करायची असती, तर इतके दिवस संजय तुरुंगात राहिले नसते. आप, केसीआर, सोरेन आणि ममता दीदींना भाजप छळत आहे. हे सगळे एकत्र आल्यावर काय होईल, हे भाजपल्या दिसत नाहीये. आमी संजय, सुनिल, आई, वहिनी आणि मुलींचही कौतुक करेल. त्यांनीही मोठा लढा दिला आहे. मी मधल्या काळात भावूक झालो होतो, त्याला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. हा खडतर काळ त्याच्यासाठी होता, तसाच आमच्यासाठीही होता,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.