संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 06:42 IST2024-12-22T06:41:05+5:302024-12-22T06:42:35+5:30
संजय मोरे याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

संजय मोरेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी; कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सुनावणी
मुंबई: कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आरोपी असलेला चालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अपघाताचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याने संजय मोरे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती कुर्ला पोलिसांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, संजय मोरे याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया आरटीओने सुरू केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गेली २३ वर्षे त्याच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना होता. आता परवाना रद्द केल्यावर तो गाडी चालवू शकत नाही. ९ डिसेंबर रोजी कुर्ला बस डेपोतून निघालेल्या बेस्ट बसवरील संजयचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले होते.