"अनिल परबसुद्धा टॉवेलवर बसले होते, त्यांना बघून वाटलं की..."; संजय गायवाडांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:53 IST2025-07-18T13:52:28+5:302025-07-18T13:53:08+5:30

चड्डी बनियन गँग म्हणून टीका करणाऱ्या अनिल परबांवर संजय गायकवडांनी टीका केली.

Sanjay Gaikwad criticized Anil Parab for criticizing him as a chaddi baniyan gang | "अनिल परबसुद्धा टॉवेलवर बसले होते, त्यांना बघून वाटलं की..."; संजय गायवाडांची बोचरी टीका

"अनिल परबसुद्धा टॉवेलवर बसले होते, त्यांना बघून वाटलं की..."; संजय गायवाडांची बोचरी टीका

Sanjay Gaikwad on Anil Parab: आमदार निवासातील कँटिनमधल्या जेवणावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा देखील झाला. मात्र संजय गायवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस टॉवेल आणि बनियनवरच मारहाण केली होती. याआधी मंत्री भरत गोगावले यांचाही बनियवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुनच विरोधकांनी शिंदे गटाचा चड्डी बनियन गँग असा उल्लेख करत आंदोलन केलं होतं. ठाकरे गटाचे अनिल परब यांनीही विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी अनिल परबांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार निवासातील कँटिनमधल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. अनिल परब यांनी विधानपरिषदेत सदर मुद्दा उपस्थित करत संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सरकारमधील एक माजलेला आमदार टॉवेल, बनियानवर कँटिनमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग स्टाईलमध्ये मारत आहे, अशी टीका अनिल परबांनी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडींच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात चड्डी बनियवर आंदोलन केलं होतं. एबीपी माझासोबत बोलताना संजय गायकवाड यांनी अनिल परबांनी प्राण्याची उपमा दिली.

"आता किती दिवस चड्डी बनियन गँग करत बसणार. आम्ही गाव खेड्याकडची माणसं, आम्ही सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण टॉवेल बनियनवर करतो. त्याचं आम्हाला वाईट वाटत नाही. आम्हाला चड्डी बनियन गँग म्हणायला आम्ही रस्त्याने मोकाट सुटलेलो नाही. आम्हाला नाव ठेवणाऱ्या अनिल परबांच्या एकदा घरी मी गेलो होतो.  ते पण टॉवेलवर नाश्ता करायला बसले होते.  मी त्यांना निरखून पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावरचे केस बघून एक मिनिटं वाटलं, हा माणूस आहे की रान डुक्कर आहे. एवढं तर विद्रुप आम्ही नाही आहोत. तुमच्याकडे बाकी प्रश्न आहेत की नाही. एकाला धडा शिकवला तर तुम्ही विधानसभेत पूर्णवेळ तेच करत बसता. विरोधी पक्षाला लाज वाटली पाहिजे," असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ऑफरवर काय म्हणाले संजय गायकवाड?

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं म्हणाले आता तिथे काय स्कोर राहिला आहे? मनसेला हाक दिली तरी ते लांब पळत आहेत. काँग्रेसचे आमदार म्हणतात की आम्ही यांच्यासोबत लढणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ऑफर बरोबर आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं.एकनाथ शिंदे हे खुद्दार आहेत. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष वाढवून त्यांनी खुद्दारी सादर केली आहे. कृतघ्नता आदित्य ठाकरे आणि त्याच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी केली आहे. त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांना नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही संजय गायकवाड म्हणाले.
 

Web Title: Sanjay Gaikwad criticized Anil Parab for criticizing him as a chaddi baniyan gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.