Sandeep Deshpande: बाळासाहेब आणि राज ठाकरे कधी रडले नाहीत, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:35 IST2022-10-11T14:33:33+5:302022-10-11T14:35:03+5:30
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

Sandeep Deshpande: बाळासाहेब आणि राज ठाकरे कधी रडले नाहीत, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई-
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत स्वबळावर लढण्याची तयारी करा, मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहत आहेत असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीनंतर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांनी आजवर अनेक पराभव पाहिले, पण ते कधी रडले नाहीत, असं संदीप देशपांडे म्हणाले.
मी तुम्हाला खुर्चीत बसवेन, स्वतः खुर्चीत बसणार नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
"धनुष्यबाण गेलं म्हणून उद्धव ठाकरेंचे डोळे पाणावले असं भास्कर जाधव म्हणाले. पण बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक पराभव पाहिले पण ते कधी रडले नाहीत. शिवसेनेला सहानुभूती मिळते आहे हा खोटा प्रचार केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका आणि लोक आमच्याकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. त्यांच्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही जोमानं कामाला लागले आहोत. तसे आदेश आम्हाला राज ठाकरे यांनी आज दिले आहेत", असं संदीप देशपांडे म्हणाले.
युती की स्वबळ? आगामी निवडणुकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, दिले असे आदेश
"सन्मानिय बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून ते जोवर हयात होते. तोवर त्यांनी अनेक विजय पाहिले आणि पराभव ही पाहिजे. पण त्यावेळी ते कधी खचून रडले नाहीत. आता परवाच्या दिवशी पक्षप्रमुख रडत वगैरे होते असं भास्कर जाधव म्हणाले. असं कधी सन्मानिय बाळासाहेब आणि राज ठाकरे रडले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार हे फक्त राज ठाकरे यांच्याकडेच आहेत. बाळासाहेबांनीही कधी सत्तेचं पद घेतलं नाही. आत जर जनता बाळासाहेबांची छबी जर कुणात पाहात असेल तर ती राज साहेबांमध्येच", असं संदीप देशपांडे म्हणाले.
मनसेच्या 'नवनिर्माणा'साठी सहा 'M' चा मास्टर प्लॅन; राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी आज आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. "आपल्याला निवडणुका पूर्ण ताकदीनिशी सर्व जागा लढवायच्या आहेत. काही लोक आम्हाला सहानुभूती मिळतेय असा खोटा प्रचार करत आहेत. अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्ही तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत बसवण्याचं काम मी करेन. मी तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत बसवेन. मी तुम्हाला सांगून स्वत: जाऊन सत्तेत बसणार नाही", असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.