शिवसेनेचे खासदार संजय राऊतांविरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:09 IST2018-10-08T16:48:04+5:302018-10-08T17:09:44+5:30

Sanatan and NCP face to face | शिवसेनेचे खासदार संजय राऊतांविरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांविरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

मुंबई : हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा ‘राष्ट्रीय पत्रकार मंचा’च्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सनातनचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुनाळेकर यांचा सत्कार केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तर काही कार्यकर्ते राऊत यांच्या दिशेने धाऊन गेल्याने वातावरण संतप्त झाले होते.  

यावेळी संजय राऊत हाय हाय, धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच पुरोगामी महाराष्ट्राचा शिवसेनेने अपमान केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणात राऊत यांना नेण्यात आले.  

 


 

Web Title: Sanatan and NCP face to face