Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:55 IST2025-12-21T16:54:15+5:302025-12-21T16:55:54+5:30
Sanjay Raut : ...ही तुमची नियत आहे. हा कसला विचार. हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे आणि हे फार काळ चालत नाही," असेही राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, संजय राऊत यांनी वेगळाच तर्क लावला आहे. तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे, अेस म्हणत त्यांनी हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत? असे विचारले असता राऊत म्हणाले, "जर आपण विधानसभेचे निकाल बघितले असतील, तर तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे. १२०-१२५ भारतीय जनता पक्ष, ५४ विधानसभेला आणि येथेही आणि ४०-४२ अजित पवार, आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन तेच सेटिंग कायम आणि तोच पैसा, ही आपली लोकशाही आहे. आपण आकडे बघाना. आकड्यांमध्ये अजिबात बदल झालेला नाही. भारतीय जनता पक्षाने मशीन त्याच पद्दतीने सेट केल्या. तेच आकडे रहायला हवेत. आकडे तरी बदलायला हवे होते. यामुळे पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतही त्याखाली झोपले गेली."
राऊत पुढे म्हणाले, "एक लक्षात घ्या, तीस कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे १५०-१५० कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट तीस कोटी आहे आणि खर्च किती होतोय, तर १०० कोटी, १५० कोटी. नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत प्रचाराला चार्टर्ड फ्लाइट आणि हेलिकॉप्टर वापरले नाही. त्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षांतच होती, कोण पुढे जातंय? स्पर्था आमच्यासोबत, विरोधी पक्षासोबत नव्हतीच. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांविरुद्ध खेळत राहिले आणि पैशांची गारपीट झाली. लोकांनाही पैसे घेऊन मतदान करायची सवेय झालीय."
हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय, सत्तेच्या दहशतीचा विजय -
"नगरपालिका निवडणुकीत चपराक वैगेरे काही नसतं. पैशांचा खेळ आहे. सत्तेचा खेळ आहे. माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू आहे. अत्ताच निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज श्रवर्धनला शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आणि तुम्ही लगेच पैशांच्या बळावर तो फोडण्याचा प्रयत्न करता. ही तुमची नियत आहे. हा कसला विचार. हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे आणि हे फार काळ चालत नाही," असेही राऊतांनी म्हटले आहे.