Sachin Waze's health deteriorates again; JJ hospital returned after examination | सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

ठळक मुद्देतसेच यापूर्वी देखील सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हाही त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना सरकारी जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तिसऱ्यांदा वाझेंनी रुग्णालयात नेण्यात आलं. दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आणि व्यापारी मनसुख हिरण यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वाजे (49) यांना गेल्या महिन्यात NIA ने अटक केली होती.

गुरुवारी दुपार १ च्या सुमारास एनआयएचे अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, वाझे यांची तपासणी केली गेली आणि नंतर त्यांना परत पाठविण्यात आले. “संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचा रिपोर्ट दिला जाईल,” असे एका सूत्राने सांगितले. अटकेनंतर वाजे यांना जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. याआधी ९ दिवसांपूर्वी देखील रात्री 10.30 च्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

तसेच यापूर्वी देखील सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हाही त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जे जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच त्यावेळी एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, आज वाझे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांची रुग्णालयात तपासणी करून परत पाठवण्यात आले आहे.  

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sachin Waze's health deteriorates again; JJ hospital returned after examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.