'दिमाग मे भुसा...' सचिन पिळगांवकरांचं नवं गाणं ऐकलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 16:42 IST2018-09-18T16:41:18+5:302018-09-18T16:42:29+5:30
'आमची मुंबई' या गाण्यानंतर सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाले होते. त्यांच्या 'मुंबई अँथम'वर डिसलाइक्सचा वर्षाव झाल्यानं यू-ट्युबवरून तो व्हिडीओ हटवण्याची नामुष्की ओढवली होती.

'दिमाग मे भुसा...' सचिन पिळगांवकरांचं नवं गाणं ऐकलंत का?
'मुंबई अँथम'च्या नावाखाली 'माय मुंबई'चं अत्यंत आक्षेपार्ह वर्णन केल्यानं टीकेचा भडिमार सोसावा लागलेले प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांचं एक नवं गाणं यू-ट्युबवर दाखल झालं आहे. त्यात 'महागुरूं'चा नृत्याविष्कार पाहायला मिळत नसला, तरी त्यांनी गायलेल्या गाण्याचे शब्द ऐकून 'दिमाग का भुसा' होऊ शकतो.
'दिमाग मे भुसा, मैने उसको लुटा, उसने दिया ठुसा, आय डॉन्ट केअर...' असं गाणं एम अकिल अन्सारी यांनी लिहिलंय. ते सचिन यांनी गायलं आहे. हे गाणं सुरू असताना, पडद्यावर जे काही घडतं, ते अनाकलनीयच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन पिळगांवकरांचे चाहते नाराज होण्याचीच शक्यता आहे. एकापेक्षा एक भारी सिनेमे देणाऱ्या सचिन यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारानं धरलेला हा 'ट्रॅक' मराठी रसिकांना अजिबातच रुचणारा नाही.
तुम्हीच बघा, कसं वाटतंय हे गाणं...
दरम्यान, 'आमची मुंबई' या गाण्यानंतर सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर लक्ष्य झाले होते. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या 'मुंबई अँथम'वर डिसलाइक्सचा वर्षाव झाल्यानं यू-ट्युबवरून तो व्हिडीओ हटवण्याची नामुष्की ओढवली होती. हा व्हिडीओ मी माझ्या मित्रासाठी केला होता, अशी सारवासारव सचिन यांनी केली होती. आता त्यांच्या 'दिमाग मे भुसा' या नव्या गाण्याला कसा 'प्रतिसाद' मिळतो, हे पाहायचं.