मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:01 AM2019-04-26T05:01:36+5:302019-04-26T05:02:00+5:30

राज्यातील सर्वांत श्रीमंत विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा चालू शैक्षणिक वर्षासाठीचा विद्यार्थी केंद्रित अर्थसंकल्प गुरुवारच्या अधिसभेत मंजूर झाला.

Rs. 695 crores budget sanctioned by Mumbai University | मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

Next

मुंबई : राज्यातील सर्वांत श्रीमंत विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा चालू शैक्षणिक वर्षासाठीचा विद्यार्थी केंद्रित अर्थसंकल्प गुरुवारच्या अधिसभेत मंजूर झाला. २०१९-२०२० या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. या प्राधान्यक्रमात विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी वसाहत, संग्रहालय कॉम्प्लेक्स इमारत, १०० क्षमतेचे अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह अशा नियोजित बांधकामांचा समावेश आहे.

विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांवर भर देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वसमावेशक असा २०१९ - २० सालचा ६९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. २०१९-२०२० चा ६९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प डॉ. अजय भामरे, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि वित्त व लेखा अधिकारी संजय शहा यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या मान्यवर सदस्यांसमोर सादर केला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत या वर्षीचा हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ६८.८१ कोटींची तूट दाखविण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी विद्यापीठाला एकूण ११ लाखांची देणगी प्राप्त झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यापीठाने नावीन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांसाठी भरघोस तरतूद केली आहे. यामध्ये संशोधनवृत्तीला चालना देऊन संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी संशोधन करून प्रकाशनासाठीचा पुरस्कार, संशोधनासाठी नवीन उपक्रम राबविण्यासाठी नेतृत्व करणे, संशोधनासंदर्भात सल्लामसलत, पुस्तक प्रकाशन, उत्कृष्ठ संशोधन, नवीन संशोधकांना प्रोत्साहन, एम.फीलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, व्हाईस चान्सलर फेलोज, इन्क्युबेशन सेंटर, महिलांसाठी कल्याणकारी योजना, जगातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांत समाविष्ट होण्याची उद्दिष्ट्ये, आंतरराष्ट्रीय सहभाग कक्ष, इतर विद्यापीठातील उत्कृष्ट कामाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधनात्मक काम करणारे शिक्षक आणि अधिसभा सदस्यांना पारितोषिके, सहयोगी प्राध्यापक आणि प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र, विद्यार्थी विकास, संशोधन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरक्षण, वित्तीय स्वयंपूर्तता आणि पारितोषिके अशा अनेक बाबींवर भर देण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अर्थसंकल्पावर सिनेट सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन अधिकारी यांची चर्चा सुरू होती.

२०१९-२०२० वर्षासाठी काही प्रमुख योजनांसाठीची तरतूद (रुपये)
संशोधकांना मानधन - ३ कोटी २५ लाख
इन्क्युबेशन सेंटर - १ कोटी ५० लाख
महिलांसाठी कल्याणकारी योजना - १ कोटी ५० लाख
जगातील उत्कृष्ट १०० विद्यापीठांत समाविष्ट होण्याची उद्दिष्ट्ये - १५ लाख

इतर विद्यापीठातील उत्कृष्ट कामाच्या अभ्यासासाठी शिक्षक, व्यवस्थापन, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा- ६ लाख
विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधनात्मक काम करणारे शिक्षक आणि अधिसभा सदस्यांना पारितोषिके - ४० लाख
सहयोगी प्राध्यापक - १ कोटी
प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र - १ कोटी
झाराप आणि सिंधुदुर्ग येथील प्रस्तावित परिसरासाठी - २ कोटी
पालघर प्रस्तावित परिसरासाठी - १ कोटी
विद्यार्थी कल्याण निधी - १ कोटी
पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये सहभागासाठी - ५ लाख
आदिवासी भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी - ६० लाख
विद्यापीठातील उत्कृष्ट विद्यार्थी (पुरुष/महिला) - १ लाख
यूपीएससी कोचिंगसाठी - २ लाख
नवसंशोधनासाठी - ५ लाख
आरक्षित विद्यार्थ्यांना वित्तीय मदत - ४२ लाख
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी - ६० लाख
विद्यापीठातील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन - १० कोटी

२०१९-२०२० या वर्षामधील नियोजित बांधकामे
विद्यिार्थी भवन- २ कोटी
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत- ४ कोटी
संग्रहालय कॉम्पलेक्स इमारत- ३ कोटी ५० लाख
१०० क्षमतेचे अतिथीगृह-४ कोटी
५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह- ४ कोटी

Web Title: Rs. 695 crores budget sanctioned by Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.