Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेससोबत असताना झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे 'युती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:04 IST

काँग्रेसने माझं सामान घराबाहेर काढले. काँग्रेसनेच मला बंगल्यातून बाहेर काढलं.

मुंबई - शिर्डीमध्ये मी काँग्रेसोबत असताना माझी झाली होती माती, म्हणूनच माझ्योसमोर आहे शिवसेनाभाजपाची युती. मी तर आहे साऱ्या महाराष्ट्राचा साथी, असे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपण युतीसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना-भाजपाच्या सभांमध्येही मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्ष सोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेही ते म्हणाले.   

काँग्रेसने माझं सामान घराबाहेर काढले. काँग्रेसनेच मला बंगल्यातून बाहेर काढलं. माझे फोटो, बाबासाहेबांचे फोटो बाहेर काढले. शिर्डीमध्ये काँग्रेससोबत असताना माझी झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे शिवसेना-भाजपाची युती, अशी नेहमीच्या स्टाईलने कविता करत आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी भाजपासोबत रुळलेलो आहे, कारण माझ भाजपासोबत जुळलेलं आहे, असे म्हणत आपण युतीसोबतच राहणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं. 

राजकारणात सगळ्याच गोष्टी समाधानकारक होत नाहीत. मात्र, गेल्या 5 वर्षात शिवसेना-भाजपा एकत्र नव्हते. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत होते. पण, आता दिलजमाई झाली आहे. मी मागितलेल्या जागेवर काय होतं ते पाहुया. भाजपाने एक जागा आणि शिवसेनेनं एक जागा सोडावी, अशी माझी मागणी होती. मी लोकांमधला नेता आहे, त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातून मी उभारावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाला कमी लेखण्याचं काहीही कारण नाही, असे म्हणत अजूनही आठवले यांनी आशावाद व्यक्त केला आहे.  

देशातला कुठलाच पक्ष दलितविरोधी नाही. पण, दलितांवर अन्यात होत आहे. तरीही, समाजात बदल होत आहे हेही मान्य करायला हवंय. अत्याचार हे सरकार कोणाचं आहे, त्यामुळे होत नाहीत. तर, समाजातील काही लोकांच्या मनात जातीवाद आहे. त्यातून या घटना घडत असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आंबेडकरांनी भाजपा सरकार दलितविरोधी नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच भाजपा बाबासाहेबांना मानते, नरेंद्र मोदी बाबासाहेबांना मानतात. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्याचे मोदी सांगतात, याचाही उल्लेख आठवलेंनी केला. दरम्यान, देशात भाजपला 282 जागा मिळाल्या, महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या. यावरुन दलितांचीही मते भाजपाला मिळालीत, हे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दाखलाही आठवलेंनी दिला.  

टॅग्स :रामदास आठवलेशिवसेनाभाजपानरेंद्र मोदीकाँग्रेस