मुंबई - शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वयोमर्यादेतील तफावत लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर रोमँटिक मेसेज पाठविणाऱ्या आणि प्रोबेशनवर असलेल्या सहायक शिक्षकाची सेवासमाप्ती करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा निर्णय योग्य आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने शाळा लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिक्षकाचे अपील फेटाळले.
रायगड जिल्ह्यातील एका शाळेत सहायक शिक्षक म्हणून प्रोबेशनवर असलेल्या एका शिक्षकाची सेवा शाळा व्यवस्थापनाने समाप्त केली. शाळा लवादाने शिक्षकाला दिलासा देण्यास नकार दिला. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले. शिक्षकाचे वर्तन गंभीर स्वरूपाचे आहे. ३० वर्षीय शिक्षक विद्यार्थ्यांना रोमँटिक मेसेज पाठवितो, अशी पालकांची तक्रार आहे, असे न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी म्हटले आहे.
प्रकरण काय?२९ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षकाची तीन वर्षांसाठी नियुक्ती केली. मात्र, २०२२ मध्ये शिक्षकाविरोधात पालकांनी तक्रारी केल्या. शिक्षकाने मुख्याधापकांकडे लेखी माफी मागितली. या प्रकरणामुळे शाळेबाहेर जमाव जमला. त्यावेळी मुख्याधापकांनी शिक्षकाला वाचविले. त्यानंतर ३१ जानेवारी २०२३ रोजी शाळेने त्याला एक महिन्याचे वेतन देत १ फेब्रुवारी २०२३ पासून सेवा समाप्त केली.
Web Summary : A teacher's termination for sending romantic WhatsApp messages to students was upheld by the High Court, citing the age gap and parental complaints. The court dismissed the teacher's appeal, deeming the school management's decision appropriate after parents complained about the teacher's behavior.
Web Summary : छात्रों को रोमांटिक व्हाट्सएप संदेश भेजने के लिए एक शिक्षक की बर्खास्तगी को उच्च न्यायालय ने बरकरार रखा, जिसमें उम्र के अंतर और माता-पिता की शिकायतों का हवाला दिया गया। अदालत ने शिक्षक की अपील को खारिज कर दिया, माता-पिता द्वारा शिक्षक के व्यवहार के बारे में शिकायत करने के बाद स्कूल प्रबंधन के फैसले को उचित ठहराया।