Rohit Shetty: रोहित शेट्टी गोळीबारामागे शुभम लोणकरच मास्टरमाइंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:13 IST2026-02-06T13:11:37+5:302026-02-06T13:13:15+5:30

Rohit Shetty Firing Case: मुंबईच्या गुन्हे शाखेने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी प्रगती केली आहे. या संपूर्ण कटाचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, त्याला मदत करणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठादाराला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.

Rohit Shetty: Shubham Lonkar is the mastermind behind Rohit Shetty shooting | Rohit Shetty: रोहित शेट्टी गोळीबारामागे शुभम लोणकरच मास्टरमाइंड!

Rohit Shetty: रोहित शेट्टी गोळीबारामागे शुभम लोणकरच मास्टरमाइंड!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा शुभम लोणकरच मास्टरमाईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानेच आरोपींना शस्त्रासह अन्य कामासाठी फंडिंग केली. या प्रकरणात शुभमच्या सांगण्यावरून आरोपींना शस्त्र पुरविणारा आसाराम श्रीरंग फासले ऊर्फ बाबू (४२) याला गुरुवारी पुण्यातून अटक करण्यात आली. या टोळीच्या रडारवर अन्य बॉलिवूड स्टार असल्याचेही समोर येत आहे. गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे.

गोळ्या झाडणाऱ्यासह लोणकर  गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. मात्र घटनेनंतर गुन्ह्यात वापर झालेल्या दुचाकीआधारे गुन्हे शाखेने स्वप्नील सकट, समर्थ पोमाजी, सिद्धार्थ येनपुरे आणि आदित्य गायकी या लोणकरच्या  साथीरांना बेड्या ठोकल्या.  फासलेसह पाचही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी स्वप्निल सकटच्या घरातून एक पिस्तूल, तीन मॅगझीन आणि एक एअर गन जप्त केली आहे. त्याच्या चौकशीतून फासलेची माहिती समोर आली. त्यानेच हे शस्त्र पुरवले होते. फासलेने सकटला ३ पिस्टल दिले.  एकातून शेट्टी याच्या घरावर गोळीबार  झाल्याचा संशय आहे. 

‘तो’ बिष्णोई गँगच्या कृत्यांमुळे प्रभावित

फासले हा ११ वी शिकलेला असून मेकॅनिक म्हणून काम करतो. इतर चार आरोपी हे त्याच्याच परिसरातील राहणारे आहेत. यातील काही शिक्षण घेत आहेत, तर काहींनी मध्येच शिक्षण सोडले आहे. तो शुभमच्या थेट संपर्कात होता. लोणकर हा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात ‘वॉन्टेड’ आरोपी आहे. पुण्यातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आणि लॉरेन्स बिष्णोई गँगच्या कृत्यांना प्रभावित होऊन आरोपी यात सहभागी झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

साथीदारांना पुरवले फंडिंग

लोणकर याने शेट्टी यांच्या घरावर गोळीबार घडवून आणण्यासाठी आरोपी सकटसह पुण्यातील अन्य तीन साथीदारांना फंडिंग पुरवल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. याच रक्कमेतून पुण्यातील साथीदारांनी दुचाकी, शस्त्रसाठा आणि अन्य आवश्यक वस्तू गोळा केल्या. ही रक्कम लोणकरने साथीदारांपर्यंत कशी, कोणत्या माध्यमातून पोहाेचवली, याचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.

कोर्टात काय घडले?

पोलिसांनी तपासासाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती. पोलिसांनी सांगितले की, फासले याने ३ शस्त्रे दिली होती, त्यापैकी केवळ एकच जप्त झाले आहे. उर्वरित दोन शस्त्रांचा शोध घेणे आणि फरार मुख्य आरोपीचा शोध घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे, आरोपींचे वकील अजिंक्य मिरगल यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, पहिल्या चार मुलांचा संबंध केवळ दुचाकी विकण्यापुरता होता. त्या गाडीचा पुढे काय वापर झाला, याची त्यांना कल्पना नाही. या मुलांचा बिष्णोई गँगशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.

Web Title : रोहित शेट्टी गोलीबारी: शुभम लोणकर मास्टरमाइंड, हथियार आपूर्तिकर्ता गिरफ्तार।

Web Summary : रोहित शेट्टी पर गोलीबारी के पीछे लॉरेंस बिश्नोई गिरोह का शुभम लोणकर मास्टरमाइंड है। उसने शूटरों को फंडिंग की और हथियार आपूर्तिकर्ता आसाराम फासले को गिरफ्तार किया गया है। अन्य बॉलीवुड सितारे भी खतरे में हैं। पुलिस जांच जारी है।

Web Title : Rohit Shetty shooting: Shubham Lonkar mastermind, weapons supplier arrested.

Web Summary : Shubham Lonkar of Lawrence Bishnoi gang is the mastermind behind the Rohit Shetty shooting. He funded the shooters and a weapons supplier, Asaram Fasale, has been arrested. Other Bollywood stars are also at risk. Police investigation is ongoing.