रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 21:13 IST2026-03-21T21:12:38+5:302026-03-21T21:13:08+5:30

Rohit Shetty Firing Case: बॉलिवूडमधीस प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Rohit Shetty firing case: 14th accused Golu Pandit arrested from Uttar Pradesh | रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक

रोहित शेट्टी  गोळीबार प्रकरण: १४ वा आरोपी गोलू पंडित याला उत्तर प्रदेशातून अटक

बॉलिवूडमधीस प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चौदावा आरोपी असलेल्या गोलू पंडित याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेश एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. गोलू पंडित याला मुंबईत आणले जात असून, त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील 'शेट्टी टॉवर' या निवास्थानाबाहेर गोळीबार झाल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. तसेच या घटनेमुळे सिने जगतात एकच खळबळ उडाली होती. हा गोळीबार बिश्नोई गँग कडून करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपींची घरपकड करण्यात आली होती.

या गोळीबार प्रकरणी  कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीचा साथीदार शुभम लोणकर याच्यासह स्वप्निल सकट (२३), समर्थ पोमाजी (१९), सिद्धार्थ येनपुरे (१९) आणि आदित्य गायकी (१९) या चौघांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती. त्यानंतर तपासाची सुत्रे आणखी वेगाने फिरवत पोलिसांनी एकूण १३ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आज गोलू पंडित याच्या रूपात पोलिसांनी चौदाव्या आरोपीला अटक केली आहे. 

Web Title : रोहित शेट्टी गोलीबारी मामला: चौदहवां आरोपी गोलू पंडित उत्तर प्रदेश से गिरफ्तार

Web Summary : रोहित शेट्टी गोलीबारी मामले में 14वें आरोपी गोलू पंडित को पुलिस ने एटीएस की मदद से उत्तर प्रदेश से गिरफ्तार किया। उसे रविवार को मुंबई कोर्ट में पेश किया जाएगा। गोलीबारी फरवरी में शेट्टी के जुहू स्थित आवास के बाहर हुई थी, जिसका संबंध बिश्नोई गिरोह से है।

Web Title : Rohit Shetty Shooting Case: Fourteenth accused Golu Pandit arrested in UP.

Web Summary : Police arrested Golu Pandit, the 14th accused in the Rohit Shetty shooting case, from Uttar Pradesh with ATS assistance. He will be produced in Mumbai court on Sunday. The shooting occurred outside Shetty's Juhu residence in February, linked to the Bishnoi gang.