मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:57 IST2018-11-01T14:29:21+5:302018-11-01T14:57:32+5:30
पक्षासाठी अशी सकारात्मक परिस्थिती असताना मनसेच्या नेत्यांमध्येच खटके उडत असल्याचे चित्र समोर आले आहे.

मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!
मुंबई - जवळ आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे झांझावाती दौरे काढत आहेत, तर मनसैनिकही कमालीचे आक्रमक झाले आहेत. मात्र पक्षासाठी अशी सकारात्मक परिस्थिती असताना मनसेच्या नेत्यांमध्येच खटके उडत असल्याचे चित्र समोर आले आहे. आज मुंबईत पालिकेच्या एल विभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करण्यासाठी गेलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे या आंदोलनातून संदीप देशपांडे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.
परिसरातील विविध समस्या मांडण्यासाठी मनसेकडून मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संदीप देशपांडे हे आपल्याला बोलू देत नसल्याने मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर नाराज झाले. त्यांनी मोर्चाच्या ठिकाणीचा आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. या प्रकारामुळे संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला.